मुखेडच्या श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रात श्रीगुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास प्रारंभ

468
दादाराव आगलावे,
मुखेड, नांदेड –
मुखेड येथील नागेंद्र मंदिरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरु चरित्र पारायण व अखंड नामजप यज्ञ सप्ताहास दिनांक 12 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला असून या यज्ञात असंख्य भक्तांनी सहभाग नोंदविला आहे.

मुखेड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात नियमित विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या केंद्राशी हजारो भक्तगण जोडलेले आहेत.येथे सेवेकरी नियमित सेवा बजावत असतात.आज दिनांक 12 डिसेंबर पासून श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विशेष याग सकाळी भूपाळी आरती नंतर आहे. दिनांक 13 डिसेंबर रोजी श्री गणेश याग व मनोबोध याग तर दि.14 डिसेंबर रोजी श्री गीताई याग, 15 डिसेंबर रोजी चंडी याग (फुल देवीची उपासना) तर 16 डिसेंबर रोजी श्री स्वामी याग आहे. या सप्ताहनिमित्त सव्वा कोटी मंत्र जपात सहभागी होण्याचे आवाहन शंतनु कोटगिरे व बाळू गबाळे यांनी केले आहे. सदरील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन व्यंकटेश कवटीकवार, सतीश बेदरकर, बालाजी स्वामी, तोटवाड, शंकर पांचाळ, राजू इंगोले,शंतनु कोडगिरे,उत्तम कोडगिरे,अल्का चिद्रे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.