मुजामपेठ येथे घरफोडी; हजारोंचे दागिने लांबविले.

678

नांदेड –

अज्ञात चोरटयांनी घराच्या दारावरील कुलूप-कोंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख ५ हजार ५०० रूपयांसह तब्बल ५४ ते ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याची दागिने चोरून नेले. ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्रीचे सात ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा नऊवाजेच्या दरम्यान नावघाट रोडवरील मुजामपेठ येथे घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, नवीन नांदेड परिसरातील मुजामपेठ येथील रहिवासी डॉ. अहमद उवेस हुवैतीब महमद हामेद हुसेन हे १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून लेबर कॉलनी, नांदेड येथे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले. दरम्यान, अज्ञात चोरटयांनी घराला कुलूप असल्याची संधी साधत १२ सप्टेंबर रोजी रात्री ७ ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा नऊवाजेच्या दरम्यान घराच्या दारावरील कुलूपकोंडा तोडून घरात प्रवेश केले. त्याचवेळी चोरटयांनी घरातील कपाटा मधील नगदी ५ हजार ५०० रुपये व नऊ ग्रॅम वजनाचे ३५ हजार रूपयांचे सोन्याचे एक गंठन तसेच ३ ग्रॅम वजनाचे अंदाजे १२ हजार रूपयांचे ३ नथ असा एकूण तब्बल ५२ हजार ५०० ते ५५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे, असा आरोप डॉ. अहमद उवेस हुवैतीब महमद हामेद हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याची माहिती ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी व मदतनीस पो. कॉ. तुकाराम नागरगोजे यांनी दिली.

याप्रकरणी अहमद उवेस हुवैतीब महमद हमेद हुसेन यांनी दिलेल्या तक्रारी आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नामदेव सूर्यवंशी आणि त्यांचे अन्य सहकारी कर्मचारी याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.