मोठी बातमी..! खुशखबर. महाराष्ट्रातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.

5,340

मुंबई-
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यात बंद झालेल्या राज्यातल्या शाळा येत्या ४ आॅक्टोबरपासून पुन्हा सुरु होत आहेत.

शिक्षण विभागाने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत गेले काही महिने विविध स्तरांवर चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करायला परवानगी दिली नव्हती. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.

४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार..

मुख्यमंत्र्यांनी सध्या हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. राज्यात शाळा बंद झाल्यानंतर मागील संपूर्ण वर्ष आणि त्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरु होते. मात्र त्याला अनेक मर्यादा येत होत्या. आता मात्र शाळांचे वर्ग पुन्हा एकदा विद्यार्थांनी गजबजणार आहेत. आता शाळा नक्की कशा सुरु केल्या जातील, याबाबत लवकरच आदेश निघण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.