मोठी बातमी ! नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रोनचा शिरकाव !

दक्षिण आफ्रिकेतून आलेले तीन जण कोरोनाबाधित, प्रशासन सतर्क.

1,629
नांदेड –
संपूर्ण जगभरात डेल्टा प्लस कोरोनानंतर नव्या व्हेरियंट ओमायक्रोनने थैमान घातले आहे. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, तसेच मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर येथे काही रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रहिवासी असलेले तीन रुग्ण ओमायक्रोन कोरोना संशयित असल्याचे आरोग्य आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून ओमायक्रोनचे संकट टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नांदेड येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. या तिन्ही नागरिकांचे नमुने आता जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ओमायक्रोनचा धोका नांदेड जिल्ह्याला निर्माण झाले असून जिल्ह्यात ओमायक्रोनचे सावट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 302 नागरिक परदेशातून आल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये ओमायक्रोनचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आजतागायत विदेशातून आलेले 302 नागरिक आरोग्य विभागाच्या देखरेखी- खाली असून या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामधील तिघांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले आहे. यांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आले नाही. हे तिन्ही रुग्ण हिमायत- नगर येथील रहिवासी आहेत. त्यांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरनात ठेवण्यात आले आहे.त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग- साठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांचा अहवाल नेमका काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनही याकडे लक्ष देवून आहे. या प्रकारानंतर नांदेड जिल्ह्यात ओमायक्रोनचे सावट दिसत असले तरी हे संकट येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.