मोबाईल धारकांनो सावधान.! सोशल मीडियावर टाटा कंपनीच्या नावाने फेक मेसेजचा सुळसुळाट..
टाटा कंपनीच्या नावाने फेक मेसेज,वाचा आणि वेळीच सावध व्हा.!
नांदेड –
व्हेलेंटाईन डे निमित्त ताज हॉटेलकडून तुम्हांला खास बक्षीस देण्यात येणार असून ताज हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आल्याचा फेक मेसेज फेब्रुवारी महिन्यात सोशल माध्यमांवर चांगलाच फिरला आणि अनेकांचे खाते रिकामे करण्यास हे हॅकर यशस्वी झाले. अगदी तसाच प्रकार आज सोशल मीडियावर पहावयास मिळाला.आज सकाळ पासूनच राज्यातील जिल्हाभर विविध व्हाट्सअप ग्रुपवर टाटा मोटर्स सेलिब्रेशन नावाने एक मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
टाटा मोटर्सचा 150 वा वर्धापन दिन असून ही लिंक इतर ग्रुपवर फॉरवर्ड केल्यास तुम्हांला एक जबरदस्त भेट वस्तू मिळणार असून तुम्ही टाटा मोटर्स तर्फे एक कार सुद्धा जिंकू शकता यासाठी आम्ही 50 जणांची निवड केली आहे. या सर्वांना बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. यात 50 लकी विजेते ठरणार आहेत. हा सर्वे आमची गुणवत्ता तपासण्यासाठी केला जात आहे. तसेच यामद्धे 100 टक्के बक्षीस देण्यात येणार आहे. तुम्हांला केवळ 4 मिनिट 24 सेकंदात या सर्वेतील प्रश्नांची उत्तर द्यायची असून बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्वरा करा, बक्षिसांची संख्या ही मर्यादीत आहेत, असा इंग्रजी भाषेमधील मेसेज तुम्हांला आल्यास त्यावर क्लिक करु नका अथवा त्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नका.
👆हाच तो व्हाट्सअप वरील फिरणारा फेक मेसेज..
अशा बनावट वेबसाईटपासून वेळीच सतर्क रहा. तसेच एसएमएस, ई-मेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. फ्रॉड करणारे अशा प्रकारच्या खोट्या वेबसाईट किंवा लिंकद्वारे युजर्ससह फसवणूक करण्याचा प्रयत्न करु शकतात.असा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. मेसेजमध्ये जी लिंक दिली आहे. ती ओपन करु नका. या लिंकला क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.त्यामुळे नागरिकांनी या लिंकविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे.तसेच अशी कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करु नका. जर आर्थिक फसवणूक झालीच तर वेळ न दडवता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर सेल सोबत संपर्क साधावा..