युवकांनी भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे.-पो.नि.अशोक जाधव
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी व स्पर्धेत राहण्यासाठी युवकांनी मोठे विचार ठेवून जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. माणूस जबाबदारी घेतल्यास परिपूर्ण होतो व आपले यशाचे शिखर गाठू शकतो,असे आवाहन यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे आयोजित राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के.पाटील हे होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अँड.उदयराव निंबाळकर, सहसचिव श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड, बालाजीराव जाधव प्रसिद्ध उद्योगपती, चंद्रकांत गव्हाणे, सदस्य अंतर्गत गुणवत्ता कक्ष, शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर. कार्यक्रमाचे संयोजक प्रा.रघुनाथ शेटे,मधुकर बोरसे यांची उपस्थिती होती.यावेळी श्रद्धेय डॉ.शंकराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पोनि अशोक जाधव म्हणाले की युवकांनी नकारात्मक भावना ठेवू नये. परिस्थितीनुसार बदलले पाहिजे व स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून घेऊन अभ्यास करून यश प्राप्त केले पाहिजे.याप्रसंगी प्राचार्य रावसाहेब शेंदारकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करून आपले व आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून जीवन यशस्वी केले पाहिजे.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.के.के.पाटील म्हणाले युवकांनी अधिकाऱ्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून त्या दृष्टीने आपली वाटचाल केली पाहिजे. स्पर्धा ही जीवनभर असते ती प्रत्येक ठिकाणी असते त्या स्पर्धेमध्ये आपण शिकले पाहिजे. यासाठी कठोर प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
याप्रसंगी रासेयोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी घेत सहभाग घेतलेल्यांचा सत्कार उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पत्रकार लक्ष्मीकांत मुळे,नागोराव भांगे,गुणवंत वीरकर,शंकराव ढगे,आनंद शिनगारे व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ.रघुनाथ शेटे यांनी केले तर आभार डॉ.जे.सी. पठाण यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक ,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.