येत्या दोन दिवसात कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा लांजी ग्रा.प.चा निर्धार.

एकाच दिवशी १२० जणांनी घेतली कोरोना लस; ७४ टक्के लसीकरण पूर्ण.

424

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत माहर पं.स.चे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात लांजी ग्रा.प.ने पुढाकार घेऊन दि.२३ रोजी कोरोना लसीकरण न झालेल्या १२० नागरिकांना लस देऊन ७४ टक्के लसीकरण पूर्ण केले आहे.

मिशन कवच कुंडल योजने अंतर्गत दि.२३ रोजी गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या लांजी गावात ग्रा.प.चे उपसरपंच तथा तंटा मुक्त गाव समितीचे अध्यक्ष संतोष कोपुलवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील आडे, ग्रामसेवक श्रीमती राक्षसमारे, यांनी गावामध्ये फिरून  जनजागृती करून अद्याप कोरोना लसीकरण न झालेल्या नागरिकांना समुपदेशन करून लसीकरणमध्ये लस दिल्या. एकंदर मौजे लांजी गावात ७४ % लसीकरण पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात शतप्रतिशत लसीकरण करून कोरोना सुरक्षित गाव करण्यासाठी उपसरपंच तथा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संतोष कोपुलवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील आडे हे परिश्रम घेत आहेत.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे उपसरपंच संतोष कोपूलवार, माजी सरपंच सतिश देवपूलवार व सहकारी यांच्या आवाहनाला नागरीकाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात संपूर्ण गावात १०० % लसीकरण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा संकल्प उपसरपंच संतोष कोपुलवार,राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुका उपाध्यक्ष सुनील आडे यांनी केला आहे.यासाठी अंगणवाडी सेविका कांताबाई दादाराव तन्नेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.आरोग्य सहाय्यक आर.एच.बोराडे, आरोग्य सेविका आर.एच.गौरी यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.