येळेगाव येथील राशन दुकानदारावर कार्यवाही करावी-तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्याकडे महिलांची मागणी.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील (क्र.१.)राशन दुकानदार महिला व पुरूषांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असून राशन वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता करत असल्याने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी येळेगाव येथील महिलांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांचाकडे केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील स्वस्त धान्य नंबर (१) हे दुकानदार मालाचे वितरण बरोबर करीत नसल्याने तसेच महिला राशन दुकानवर स्वस्त धान्य घेण्यासाठी गेले असता दुकानदार हे गावातील महिलांना शिवीगाळ करत असून स्वस्त धान्य मालाचे वितरण व्यवस्थित वाटप न करता अनियमितता करत आहे.येळेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून ग्रामस्थांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार उज्वला पांगरकर यांना येळेगाव येथील ग्रामस्थ व महिलांनी दिले आहे.
यावेळी पंचायत समिती शिवसेनेचे उपसभापती अशोक पाटील कपाटे,भाजपा युवा मोर्चाचे अमोल कपाटे, रेवताबाई कपाटे, सागरबाई कपाटे, सुनिता जाधव, सुरेखा भरकड, लक्ष्मीबाई तुपेकर, सरस्वती कपाटे, द्रोपदा कपाटे, विक्रम कपाटे,भद्रीनाथ कपाटे, अनिल कपाटे, मारुती कपाटे, माणिका कपाटे, ईश्वर कपाटे, संतोष मामीलवाड, नागोराव कपाटे, गजानन कपाटे अशा ४४ जणांच्या सह्या या निवेदनावर आहेत.