राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माहूर तालुका सचिव पदी अभिजित राठोड यांची नियुक्ती.

271

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व माहूर न.पं.ची सार्वत्रिक निवड लक्षात घेऊन माहूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पक्ष संघटनबांधणीवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले असून तालुक्यातील वानोळा येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते तथा वानोळाचे माजी उपसरपंच अभिजित राठोड यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहूर तालुका सचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी नुकतीच माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेऊन पक्ष संघटन वाढीस लक्ष देण्यात यावे अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्याने माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पक्ष संघटन वाढीवर जोर दिला असून तालुक्यातील प्रभावशाली कार्यर्त्यांना पदाची संधी देण्याची भूमिका घेऊन प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशअध्यक्ष महेबूब शेख,माजी आ.प्रदीप नाईक रा.कॉ. यु कॉ. जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात दि.२७ रोजी माहूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या युवक कार्यकर्ता बैठकीमध्ये माहूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मारोती रेकुलवार यांनी अभिजित राठोड यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. या नियुक्तीने वानोळा सर्कलसह माहूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळणार असल्याने माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, दत्तराव मोहिते, तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, कुंदन पवार पाटील, नगराध्यक्षा कु.शीतल जाधव, मनोज कीर्तने, अमोल राठोड, तारासिंग चव्हाण, माजी उपसरपंच सुरेश राठोड, संजय चव्हाण, वल्लभदास पवार, राजेश राठोड, राजेश आडे आदींनी अभिजित राठोड यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.