लखीमपूर घटनेचा नायगाव शहरात फेरी काढून व बंद पाळून निषेध.

ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद.

391

नायगाव, नांदेड –

लखीमपूर (उ.प्र.) येथील केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राने आपल्या गाडीखाली शेतक-यांना चिरडून ठार केल्याच्या व पिडीत कुटूंबीयांस भेटायला जाणा-या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंकाजी गांधी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ, मोदी-योगी सरकारच्या विरोधात म.वि.आ.तर्फे पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये नायगाव शहरात चांगला पण तालुक्यात बंदला संमिश्र प्रतीसाद मिळाला.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटी व शिवसेनेच्या प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रमुख उपस्थितीत मा.तहसीलदार नायगाव यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, तालुका ख.वि.संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, युवानेते रविंद्र पाटील चव्हाण, नगराध्यक्ष शरद भालेराव, उपसभापती संजय पाटील शेळगावकर, तालुका मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अनिल कांबळे, कार्याध्यक्ष बालाजी मद्देवाड, गटनेते सुधारक पाटील शिंदे यासह नगरसेवक पांडुरंग चव्हाण,श्रीनिवास शिंदे, शहराध्यक्ष बंडू शिंदे,सुधाकर पाटील भिलवंडे,अनिल बोधने,जब्बार खान, संजय चव्हाण,बालाजी शिंदे, एनएसयूआयचे माणिक पाटील चव्हाण, एनएसयूआयचे तालुका अध्यक्ष सूरज शिंदे,नजीर बागवान, बालाजी मेटकर, पिराजी पवार,वसीम पटेल,बाबू पटेल कुंचोलीकर, सुमीत कल्याण, साई चन्नावार, राम मावले, इम्रान बागवान, टिपू सुलतान, चांदू मेटकर, डाॅ.मधुकर राठोड, शेख मदार, नवनाथ जाधव, संभाजी सज्जन, पंडीत पाटील सुगावे, हरी पाटील जाधव, देवीदास सुगावे, किरण कदम,धीरज पाटील जाधव,दत्ता पाटील जाधव,राजू पाटील, किरण कदम, शिवराज वरवट्टे, विजय सुर्यवंशी, हणमंतराव भेदे, खंडोजी देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बंदला ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद.

नायगाव शहर, नरसी ही प्रमुख गावे वगळता ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज, दुकाने,प्रतिष्ठाने चालू होती. राष्ट्रवादी, शिवसेना पदाधिकारी तालुक्यात आंदोलनात सक्रिय सहभागी दिसून आले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.