लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ बिलोलीत कडकडीत बंद.

457

ए.जी.कुरेशी

बिलोली, नांदेड –

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी,सगरोळी यासह अनेक बाजारपेठा व्यापारी दुकाने दि.११ सोमवार रोजी दुकाने बंद ठेऊन निषेध करत आंदोलन करण्यात आले आहे .

बिलोली तालुक्यात उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ दुकाने कडकडीत बंद पाळून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी तसेच आशिष मिश्राला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले तर शेतकरी आंदोलन दडपणा – या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व बिलोली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील , राष्ट्वादीचे नागनाथ पाटील सावळीकर शिवसेनेचे विजय मुंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे म्हणजे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,वलीयोदिन फारुखी,नगरासेवक अरुण उप्पलवार,मारोती पटाईत उपाध्यक्ष, आमजद चाऊस, डौरचे खयुम पटेल सह अनेकजण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.