लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ अर्धापुरात कडकडीत बंद.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ अर्धापूर, मालेगाव, भोकरफाटा दाभड, येळेगाव, कामठा, लहान यासह अनेक बाजारपेठा आज दि.११ रविवारी रोजी दुकाने बंद ठेऊन निषेध करत आंदोलन करण्यात आले आहे.
अर्धापूर तालुक्यात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ दुकाने कडकडीत बंद पाळून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी तसेच आशिष मिश्राला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले तर शेतकरी आंदोलन दडपणा-या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख, जि.प.सदस्य बबनराव बारसे, उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उद्धवराव राजेगोरे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष कपाटे, जिल्हा सचिव निळकंठराव मदने,काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण,नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक, माजी उपनगराध्यक्ष पप्पू बेग, नगरसेवक मुस्वीर खतीब, प्रल्हाद इंगोले,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदिप राऊत, शिवसेना शहरप्रमुख सचिन येवले,युवकचे विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख यांनी आंदोलन करत मोटार सायकल रॅली काढून केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे केंद्रीय मंत्र्याचा मुलाविरूद्ध कडक कारवाई करावी या मागणीसाठी दुकाने बंद करत आंदोलन केले आहे.
यावेळी नरसेवक गाजी काजी, पंडितराव लंगडे, मुक्तदरखान पठाण, सेवा दल तालुकाध्यक्ष बाळू पाटील, आर.आर.देशमुख,युवा सेनेचे काजी सल्लावोद्दीन, व्यंकटराव साखरे,उमाकांत सरोदे,उपसरपंच अरविंद पांचाळ, उप तालुकाप्रमुख सदाशिव इंगळे, पंडितराव शेटे,अशोक डांगे, दिलीपराव हट्टेकर, छत्रपती कानोडे, राजू गायकवाड,शंकर ढगे, इमरान सिद्दीकी, शेरू पठाण, कामाजी कल्याणकर,शिवप्रसाद दाळपूसे, दिगंबर तिडके, चंद्रमुनी लोणे,अविनाश लढे, गिरजाराव नरोटे, सोशल मीडियाचे शेख मकसूद,शेख रफिक, राजाराम पवार, बालाजी क्षीरसागर,वैभव धात्रक,बालाजी गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.