ललिता पंचमीनिमित्त माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी.
हजारो भाविकांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन.!
जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड –
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळ म्हणजेच ललित पंचमी, तृतीया व चतुर्थी शनिवारी हे तिथीच्या क्षयामुळे एकत्र आल्याने दि.१० रोज रविवारला ललित पंचमीनिमित्त माहूर येथील सुप्रसिद्ध रेणुकादेवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.दर्शन रांगेतील भाविकांना एक ते दीड तासात मातेचे मुखदर्शन घेता आले.
दि.१० ऑक्टोबर रोजी रविवारला सकाळी रेणुकामातेची महापूजा वैदिक अलंकार पूजन फळाची आरास करण्यात आली. श्रीदुर्गासप्तसती शतचंडीपाठ फुलोरा व पायस नैवद्य व आरती करण्याता आली. दुपारी ११:३० वा.छबिना काढून परिवार देवता श्री तुळजाभवानी, महालक्ष्मी व परिवार देवता पूजन करून नैवद्य व आरती करण्यात आली १;३० वा.महानैवद्य व महाआरती करण्यात आली. आज मातेला नारंगी रंगाचे पैठणी महावस्त्र अर्पण करण्यात आले अशी माहिती श्री रेणुकादेवीचे मुख्य पुजारी भवानीदास भोपी, विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी दिली. ऑनलाईन, ऑफलाईन पासच्या गोंधळामुळे भाविकांत संभ्रम निर्माण झाल्याने व प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन फलक नोंदणी विभाग ऑनलाईन कसे करायचे याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे होर्डिंग व फलक टी पॉइंट वर लावले नसल्याने भाविकांची प्रचंड तारांबळ उडाली, कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिवाय ऑफलाईन पास मिळत नसल्याने भाविकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती.