लोकप्रतिनिधी, प्रशासन तुपाशी दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार उपाशी..

तीन पक्षाचे मंत्रीमहोदय लक्ष देतील काय? चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांचा सवाल..

313

नांदेड –
नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांच्या मार्फत दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील आपल्या शिष्टमंडळा सहीत भेटून चर्चा करून नायगाव, बिलोली व नांदेड तालुक्यात निवेदन सादर केले. पुर्ण तालुक्यात निवेदनाने शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्र शासन प्रशासन जरी तुपाशी खात असतील पण जे दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार यांना दर महा 1000 रु. जगण्यासाठी दिले जाते त्यात दोन वेळा चहासाठी दुधाचे पाकिट सुध्दा येत नाही ते कसे जगत असतील याचा विचार सतेत बसलेल्या मंत्र्यांना कळत नसेल काय? आमदार यांना दरमहा लाखो वेतन मिळते अनेक भत्ते मिळतात प्रशासकीय कर्मचारी यांना लाखो रूपये पगार मिळताना ते पुरत नाही म्हणून ते संप करून पगार, महागाई भत्ता वाढ केली जाते मात्र ज्या गोरगरीब जनतेच्या मतावर सतेत जाताना दिनदुबळ्याचे मीच कैवारी म्हणून मते मागतात त्या लोकप्रतिनिधी दिनदुबळ्याचा विचार का करीत नाहीत? शासन प्रशासन यांना वेळेवर मानधन, पगार मिळते तर दिनदुबळ्याना मिळणारे एक हजार रुपये तेही पाच महिने मिळत नाही व अनेक सवलतीसाठी दिव्यांग वृध्द निराधार यांना शासन प्रशासन जागे करण्यासाठी मोर्चा, धरने,आंदोलन करून न्याय मिळत नसल्याने दिव्यांग वृध्द निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली नादेड जिल्हयातील सर्व तहसिलदार नांदेड यांच्या मार्फत मा.आयुक्त औरंगाबाद, दिव्यांग आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी नांदेड, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

न्याय नाही मिळाल्यास दिव्यांग रस्त्यावर उतरतील यांची प्रशासनाने दखल घ्यावी, असा इशारा दिव्यांग निराधार बांधवानी दिला आहे.या निवेदनात नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख दादाराव बंडे, तालुका अध्यक्ष गजानन हंबर्डे, महिला अध्यक्ष सविता नांवदे, नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर, बिलोली तालुका अध्यक्ष बालाजी होनपारखे, शंकर मैत्रे, शेरखान पठाण,सचिन कुंटुरकर, तूजपालसिंग, शिवाजी हंबर्डे, सचित,सखाराम बहिरदे, चौधरी संतोष, शेख मुस्ताक, मंगेश जाधव,अंबादास धोत्रे, दता हंबर्डे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत असे प्रसिध्दीपत्रक तालुका अध्यक्ष गजानन हंबर्डे यानी दिले.

I

Leave A Reply

Your email address will not be published.