शहरातील प्रसिद्ध व नामवंत कळसकर कुटुंबातील होतकरू तरुण विद्यार्थ्यांने अभ्यासातील जिद्द, चिकाटी सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर गुणवत्ता संपादित करून पुढील उच्च अभियांत्रिकी शिक्षणासाठी दि. 27 रोजी गुरुवारी जर्मनीला रवाना झाला.
लोहा येथील मराठ गल्ली भागातील रहिवासी व सध्या नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर कार्यरत नरहरी कळसकर यांचे सुपुत्र असलेला निखिल नरहरी कळसकर हा बालवयापासून चुणचुणीत, हुशार व तल्लख बुध्दीचा होता. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर त्याने इंजिनिअरिंग ची पदवी संपादन केली. व पुढील उच्च अभियांत्रिकी शिक्षणासाठी निखिलची जर्मनीत निवड झाल्यामुळे तो दि. 27 जानेवारी रोजी गुरुवारी तो विमानाने जर्मनीला रवाना झाला.
त्याच्या यशाबद्दल माजी नगरसेविका वनमाला पारेकर, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, लोहा पालिकेतील काँग्रेसचे गटनेते पंचशील कांबळे, रामकिशन पारेकर, सूर्यकांत कळसकर, चंद्रकांत कळसकर, राजेश पारेकर, विठ्ठल कळसकर, भारत कळसकर, वसंत कळसकर, विजय कळसकर, गजानन कळसकर, प्रमोद पारेकर, भूषण दमकोंडवार आदीनी सत्कार केला.