वरणगावकरच्या बदलीने रेणुका मातेच्या भविकात ही समाधान; ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी उचलला होता संस्थानच्या अनागोंदी कारभारावर आवाज.!

596

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर संस्थानवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने धर्मदाय आयुक्तांनी निर्माण केलेल्या घटनेनुसार तहसीलदार हा पदसिद्ध कोषाध्यक्ष असतो. दि.17 सप्टें रोजी नुकतीच बदली झालेले माहूर येथील तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या कार्यकाळात रेणुका देवी संस्थान मध्ये अनागोंदी सुरू असल्याची पुराव्यानिशी तक्रार राज्यपाल पासून ते संपूर्ण संबंधित विभागासह मंत्र्यांपर्यंत देऊन भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे रेणुका देवीचे निस्सिम भक्त, जेष्ठ पत्रकार संपादक डॉ.प्रशांत कोरटकर यांनी समाज माध्यमांवर यापूर्वी त्यांनी केलेल्या तक्रारीचे पुरावे जोडून वरणगावकर यांची बदली केल्याने महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करत समाधान मानले आहे.

श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी संस्थान मध्ये सुरु असलेल्या गौडबंगाला बाबतीत आपल्या चॅनेेलच्या व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून डॉ.प्रशांत कोरटकर यांनी गत वर्षी मालिकाच सुरू केली होती.ज्याचे 25 भाग त्यांनी सत्तत चालविले. हाती लागलेल्या पुराव्यावरून केवळ बातम्या प्रकाशित करून न थांबता कोरटकर यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री,महसूलमंत्री,विरोधी पक्ष नेते,विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

मात्र कोविड-19 ची दुसरी लाट पसरल्याने राज्य सरकारने कुठल्याही बदल्या कोरोना काळात करायच्या नाही असा शासन निर्णय निर्गमित केल्याने वरणगावकर यांची बदली होऊ शकली नाही. मात्र दिनांक 17 रोजी त्यांच्या बदलीचे आदेश झळकले असून त्या आदेशात बदलीचा कार्यकाळ जवळ जवळ पूर्ण झाल्याचा व विनंती बदली संदर्भात सुद्धा उल्लेख करण्यात आल्याने वेळेपूर्वी झालेल्या तक्रारी बदली करतांना त्यांचे पंख छाटण्यात आले आहे. बदली आदेशात या सगळ्या बाबी नोंद करून कुठल्याही राजकीय व न्यायालयीन प्रक्रियेला पुढे वरणगाकर यांना जाता येऊ नये म्हणून की काय, बदलीचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा 11 वाजेच्या जवळपास निर्गमित करून शनिवार व रविवार सुट्टीचा योग मुद्दामहून साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे वरणगावकर यांना सोमवार दिनांक 20 रोजी मध्यान्ह नंतर रुजू होण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. हेच आदेश कार्यमुक्तीचे आदेश असल्याचा स्पष्ट उल्लेख सुद्धा असल्याने सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

रेणुका देवी मंदिरात या पुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.-डॉ. प्रशांत कोरटकर

श्रीक्षेत्र माहूरला लुटणाऱ्या भ्रष्ट अधिकारी सिध्देश्वर वरणगांवकर याची अखेर बदली झाली. २०२० मध्ये मी पहिल्यांदा श्रीक्षेत्र माहूर रेणुकादेवी संस्थानात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारा बाबत आवाज उचलला होता. याला खतपाणी घालणारा, माहूर येथील तहसिलदार सिध्देश्वर वरणगांवकर याने ५ वर्षाहून अधिक काळ माहूर येथे राहून संस्थान आणि माहूर क्षेत्राला लुबाडले.अगदी निजामशाही चालवली.वरणगांवर बद्दल तक्रार मी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. नागपूरचे काही वरणगांवकरांचे चमचे मला ज्ञान शिकवत होते की, तुम्ही संस्थानची बदनामी करत आहे. गडकरी साहेबांच्या नावाने आपली दुकानदारी चालवणारे वरणगावकरांचे पाठीराखे यांनी ही श्री रेणुकादेवी संस्थान मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालते.आणि स्वतःला रेणुकेचे भक्त म्हणवतात अशा सर्वांचे डोळे आज उघडले असतील. सिध्देश्वर वरणगांवकर याची बदली माहूरहून करण्यात आली आहे.एखादा मुद्दा लावून धरून कुठल्याही धमकीला भिक न घालता आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व साधारण रेणुका भक्तासाठी मी हा आवाज उचलला होता. यासाठी माहूर येथील स्थानिक मित्र मा राज्यपाल, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार,जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते यांचे सर्वांचे आभार मानतो. अजून अनेक बदल संस्थान मध्ये लवकरच होणार आहे. जग्गजननी श्री रेणुका देवी मंदीरात यापुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.