वसरणी येथील हर्षनगर नामफलकाचे अनावरण.

405

नांदेड –

नांदेड- वाघाळा शहर महापालिकेच्या हद्दीतील वसरणी येथील हर्षनगर नामफलकाचे माजी महापौर गंगाधरराव मोरे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले आहे.

नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वसरणी येथील हर्षनगर परिसरातील रहिवासी तथा नागरिकांच्या उपस्थितीत हर्षनगर नामफलकाचा अनावरण सोहळा माजी महापौर गंगाधरराव मोरे यांचे हस्ते नऊ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे यांनी सदिच्छा दिल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना हर्षनगर, वसरणी येथील रहिवासी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य रोखपाल माधव बळेगावे यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाली आहे. प्रास्ताविक एम. एम. बळेगावे यांनी केले. या कार्यक्रमाला इबितदार, गंगापुरे साहेब, बी.एस. एंगडे, भंडारकर सर, बालाजी सुताडे, भीसे साहेब, प्रा. अनिल डुबुकवाड, गजुभाऊ बळेगावे व त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन ए. डी. पंदिलवाड गुरूजी यांनी, तर माधवराव बळेगावे लिंगापूरकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.