विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.०६ डिसेंबर २०२१ रोज सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महारक्तदान व मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, कोरोना लसीकरण तसेच आरोग्य तपासणी कार्यक्रम नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याशेजारी रेल्वेस्टेशन परिसरात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले व कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगरसेविका सौ.अरुधंतीताई पुरंदरे हे होते. यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून नेत्र तपासणी, चष्मेवाटप, कोरोना लसीकरण, रक्तदान करून कृतीशील अभिवादन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी सरचिटणीस विजय गंभीरे, दिलीपभाऊ ठाकुर,अशोक पाटिल धनेगावकर, माजी नगरसेविका अरुंधती पुरंदरे, उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, चिटणीस मनोज जाधव, अभिलाष नाईक, बालाजी सूर्यवंशी, शीतल भालके,ॲड.सुनिल कापुरे, पवले सर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशालीताई देशमुख, शततारका पांढरे, महादेवी मठपती,लक्ष्मी वाघमारे,गायत्री तपके,बिरबल यादव, मंडळ अध्यक्ष आशीष नेरलकर, संदिप कराळे आणि रामराव पाश्टे,शशिकांत पोतदार, गौरव वाळिंबे,गजानन पांचाळ,भास्कर डौइबळे, राज यादव,अक्षय अमिलकंठवार, सचिन चिनूरकर, संतोष गुजरे,राहुल कदम, नरेश आलमचंदानी यासह आदींनी महापुरुषांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी संयोजक कुणाल गजभारे, सोबतच सोनू पिंपळे,कबीर गजभारे, साहेबराव हाटकर, सुमेध सोनकांबळे आदीनी परिश्रम घेतले .