वेषांतर करून ऑटोचालक बनून जुगार अड्ड्यावर मारली धाड.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्तेनी दहा आरोपी केले गजाआड.

3,266

धर्माबाद, नांदेड –

धर्माबाद पासून जवळच असलेल्या चिकना शिवारातील एका शेतामध्ये छुप्या पद्धतीने पत्त्यांचा डाव चालू असल्याची बातमी धर्माबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांना समजतात पो काॅ.सुभाष मुंगल,पो काॅ.संतोष आनेराव, पो.काॅ.संतोष भोसले व इतर दोन होमगार्डना घेऊन शेतापर्यंत ऑटो चालवत ज्या शेतामध्ये अवैध पद्धतीने पत्याचा डाव चालू होता त्या ठिकाणी सहकार्‍यांना घेऊन अगदी सराईत गुन्हेगारांचा सुद्धा चकमा देत साध्या वेशात ऑटो ड्रायव्हरचे वेषांतर करून सपोनी शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या टीमने दहा आरोपींना मुद्देमालासह गजाआड केले आहे.

यापूर्वी देखील करखेली शिवारात अशाच पद्धतीने चालू असलेल्या मटक्याच्या डावावर मालवाहू गाडीमधून जाऊन शिवप्रसाद कत्ते यांनी धाड मारली होती. गेल्या अनेक दिवसापासून धर्माबाद शहरात व तालुक्यात कत्ते यांच्या नावाचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतल्यामुळे अवैध धंदे करणारे भूमिगत झाले असल्याचीही चर्चा आहे.अत्यंत सचोटीने व प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या शिवप्रसाद कत्तेच्या नावानेच अवैध धंदे करणाऱ्यांची मात्र थरकाप उडत आहे. नवरात्र सणासुदीच्या दिवसात शिवप्रसाद कत्ते या नावामुळेच गाव गुंडांचा व छोट्या-मोठ्या अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत हे मात्र सत्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.