व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाने केली खेळाडूस आर्थिक मदत.

सर्वोतोपरी मदत करण्यास सहकार्य राहील.- ॲड.चैतन्यबापू देशमुख.

474
नांदेड –

नांदेड येथील ब्राह्मण समाजाचा “शिवसमर्थ” व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील क्रिकेट खेळाडूस साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. 27 नोव्हेंबर -7 डिसेंबर 2021 मध्ये नेपाळमधील पोखरा येथे होणाऱ्या इंडो-नेपाळ टी-ट्वेंटी 20 क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नांदेड शहरातील व गुजराती हायस्कुलचा विद्यार्थी ईशान अंनत बासरकर याची भारतीय “अ ” संघात निवड झाली आहे.पण त्याच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने खेळाडूस साहित्य घेऊन देण्यासाठी पालकाने सुनिल रामदासी यांच्याशी संपर्क केला.तेव्हा सुनिल रामदासी यांनी आपल्या समाजाचा “शिवसमर्थ” व्हाट्सअप ग्रुपवर सदस्यांना आवाहन करुन विनंती केली व केवळ एका दिवसात 25000 रुपये रक्कम जमा करून खेळाडूस देऊन सन्मान करण्यात आला.

ईशान बासरकर हा इयत्ता 8 वीचा विद्यार्थी आहे.ईशान हा क्रिकेट मध्ये लहानपणापासून अष्टपैलू खेळाडू म्हणून शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने त्याची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली व राज्यस्तरीय स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट खेळ खेळल्यामुळे भारतीय अ संघात निवड झाल्याबद्दल पत्र देण्यात आले. ईशानला खेळाचे साहित्य घेण्यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य ॲड.चैतन्यबापू देशमुख, प्रांत अध्यक्ष निखिलभाऊ लातुरकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर, उद्योजक संजय औरादकर, शिवसैनिक प्रविण इनामदार हानेगांव, सुनिल रामदासी, मुंकुद कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी गोदमगांवकर, मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगांवकर, अद्वैत उंबरकर,ॲड.अभिजित देशपांडे, रोहित पाटील आडगेकर, सौ.मनिषाताई कुनसावळीकर, मनपाचे कुलकर्णी सर, सेवानिवृत्त लक्ष्मीकांत गुटुंरकर, आशीष नेरलकर,सोमेश कुलकर्णी, पत्रकार गजानन जोशी, प्रफुल कुलकर्णी,सजंय देशमुख, हेंमत जोशी, सुधीर नाईक, श्याम देशपांडे,आंनद तेरकर,सौ.स्मीताताई तेरकर, क्रिकेट अकॅडमीचे कोच कुष्णुरकर आदी सदस्यांनी आर्थिक मदत केली व शुभेच्छा दिल्या.

ईशान बासरकर याचा सत्कार करुन ही मदत सर्वांनी सुपुर्द केली.यावेळी खेळाडू ईशान बासरकर व पालक अंनत बासरकर, नांदेड क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अशोक तेरकर व सुनिल रामदासी यांनी सर्वाचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.