शंभर टके पीक विमा मंजूर करण्याची छावाची मागणी.
नायगाव, नांदेड-
नायगाव तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून अति मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिकाचे 100% नुकसान झालेले आहे. काही गावात घराचे, गुरे ढोर व कोंबड्या वाहून गेले तरी तालुक्यात 100% ओला दुष्काळ घोषित करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत व 100% सरसकट पीक विमा लागू करावा अन्यथा छावा स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा छावाच्या वतीने तहसीलदार गजानन शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.
यावेळी छावाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर, माणिक पा. चव्हाण, सुमित पा.कल्याण, छावाचे संपर्क प्रमुख साई पाटील मोरे, कामगार आघाडीचे प्रदीप पाटील उपासे,विद्यार्थीरल आघाडीचे बालाजी पा.धनजकर, अपंग आघाडीचे चंद्रकांत बेलकर, गोपाळ ढगे, ओमकार मोरे, दत्ताहरी धनजकर, आकाश कल्याण, श्रीकांत धनजकर, बालाजी सूर्यवंशी, नागनाथ सूर्यवंशी, दत्तकृष्ण हंबर्डे, परमेश्वर जाधव, माधव सूर्यवंशी, धमदीप भद्रे,परमेश्वर पाटील व नायगाव तालुक्यातील छावाचे कार्यकर्ते उपस्थित होते.