डोंगरगाव येथील ज्येष्ठ महिला नागरिक शकुंतलाबाई सदाशिवआप्पा साखरे (वय ७०) यांचे दि.१ जानेवारी शनिवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नांदेड येथे निधन झाले असून त्यांच्यावर दि.२ जानेवारी रविवार रोजी १२ वा. डोंगरगाव (पुल) ता.कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
शकुंतलाबाई सदाशिवआप्पा साखरे यांच्या पश्चात पती, चार मुले, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. त्या शिक्षक ओमप्रकाश साखरे, इंजिनियर गजेंद्र साखरे, ॲड.राजू साखरे, डॉ.श्रीनाथ साखरे यांच्या मातोश्री होत.