शासकीय यंत्रणा घेऊन नांदेड दक्षिण मतदारसंघात आ.हंबर्डे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी.
नांदेड-
गेल्या चार दिवसांपासून नांदेड शहरासह जिल्हयामध्ये जोरदार पावसाचा तडाखा सुरू होता.शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या नुकसानीची पाहणी आज दि.09 रोजी गाडेगाव, भंनगी ,राहेगाव, कांकाडी, ब्राम्हणवाडा, भायेगाव,गंगाबेट,किकी, खडकुत येथे आ. मोहनराव हंबर्डे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की, आ. हंबर्डे हे गाडेगाव, भंनगी, किकी,भायेगाव ,ब्राम्हणवाडा, राहेगाव, कांकाडी, गंगाबेट, खडकुत येथे जावून शेतक-यांच्या शेतीची पाहणी व विचारपूस केली असता उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस, तूर या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली. काही भागातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा व तालुका प्रशासन सतर्क असून जीवितहानी तसेच जनावरांच्या, गावातील वीज व इतर बाबतीत प्रशासनाला सूचना देत आहेत.
आ.मोहनराव हंबर्डे यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्याची मागणी व अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषि विभागाला दिले .यावेळी एस.डी.एम विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, प्रताप हंबर्डे ,गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.