शिरडशहापूर येथे येणार राष्ट्रीयकृत बँकेची शाखा !

नागरिकांना मिळणार दिलासा, मिलिंद यंबल यांचा पाठपुरावा

450
औंढा नागनाथ, हिंगोली –
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर हे दहा हजारच्या वर लोकवस्तीचे गाव आहे. येथे व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, हिंगोली जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरडशहापूर व जिल्ह्यातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ आहे, येथील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा राष्ट्रीयकृत बँक नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना गावाला राष्ट्रीयकृत बँक शाखा मिळावी यासाठी काही वर्षापासून भाजपा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंदभाऊ यंबल यांनी पुढाकार घेतला आहे.

या अगोदर सुद्धा गावातील नव्हे तर परिसरातील विकासाची कामे व्हावीत यासाठी नेहमीच मिलिंद यंबल यांनी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर आज भाजपा नेते मिलिंद यंबल यांनी नुकतीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड यांची दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपा नेते मिलिंद यंबल यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याबाबत त्यांनी निवेदन दिले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील तात्काळ पुढील कारवाईसाठी संबंधितांना आदेश देखील दिले आहेत. यामुळे आता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपा सरचिटणीस मिलिंदभाऊ यंबल यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळणार असून त्याच माध्यमातून गावाला राष्ट्रीयकृत बँक मिळणार आहे. बँकेमुळे आता अडीअडचणीच्या सामन्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.