शिवसेनेत आज पण राणेंमुळे पद मिळतात, नितेश राणेंनी शिवसेनेची उडवली खिल्ली.

563

मुंबई-
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राणे यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन करणा-या मोहसीन शेख या युवासेनेच्या कार्यकर्त्याची युवासेना सहसचिवपदी नेमणूक केल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला.राणे यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर युवासेनेच्या वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात युवासेनेचा कार्यकर्ता मोहसीन शेख याला पोलीसांनी चांगलाच प्रसाद दिला होता.मात्र राणे यांच्या बंगल्यासमोर युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या या कार्यकर्त्याची मंत्री आदित्य ठाकरे यांनी सहसचिवपदी मोहसीन शेख याची नियुक्ती करून गिफ्ट दिले आहे.मोहसीन शेख सध्या रूग्णालयात उपचार घेत आहे.तर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करीत सेनेला डिवचल आहे, “राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणा-या, त्या युवासेना कार्यकर्त्याची बढती” …आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात.!सिर्फ नाम ही काफी है.! अशा शब्दांत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

 

मोहसीन शेख यांनी 2017 ला राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता व शिवसेनेत प्रवेश करताच पक्ष कार्याला सुरूवात करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राणेच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यात ते आघाडीवर हिते त्यामुळे त्यांना पक्षाकडून गिफ्ट मिळालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.