‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांचे निधन

564
कोल्हापूर –
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खास वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. प्रा. पाटील गेल्या दोन वर्षांपासून घरीच होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.
एन.डी.पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदे पाटील असे होते. मात्र, एन.डी. या नावाने संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता. कष्टकरी, वंचित, कामगार, मोलकरणी अशा सर्वांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांचा जन्म ढवळी नागाव, जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.