शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद राठोड यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.

293

उमरी, नांदेड –

उमरी तालुक्यातील मौजे सिंधी येथे ग्रा.प.स.गटनेते संदेश गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा महासचिव श्याम कांबळे यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते प्रल्हाद राठोड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.

यावेळी शिवाजी पाटील जाधव, मराठा सेवा संघ नायगाव, किशनदादा गायकवाड कुदळेकर, वंचित बहुजन आघाडी उमरी डी.जि.तुपसाखरे,अवधूत गाडेकर माजी ग्रा.प.स सिंधी,गणेश राठोड सिंधिकर, धोंडिबा राठोड, नरसिंग गायकवाड सतेगावकर, नागोराव गायकवाड सातेगावकर वंचित बहुजन आघाडी उमरी संतोष वाघमारे भायेगावकर, नागोराव वाघमारे, प्रवीण वाघमारे, प्रमोद कोलते, राहुल गायकवाड मोठ्या संख्येने आदींची उपस्थिती होती व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.