शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार हेक्टरी मदत द्यावी अन्यथा राजकीय नेते मंडळींना रस्त्यावर फिरू देणार नाही- संभाजी ब्रिगेडचा इशारा.

861

सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –

संभाजी ब्रिगेडच्या वतीने अर्धापूर तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१४ गुरूवारी रोजी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा,सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, सरसकट पिक विमा मिळावा, शेतीसाठी थ्री फेज वीज दिवसा मिळावी,पिकविमा मिळण्यासाठीची उंबरवठा पद्धत रद्द करण्यात यावी, वृद्ध शेतकऱ्यांना मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या मागण्याला शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.पण शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख उमाकांत उफाडे यांनी व्यक्त केले.हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी शासनाने देऊ केले ती शेतकऱ्यांची थट्टा करण्यासाठी आहे.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही तुकोबारायांच्या पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तीन्ही लोकी झेंडा या म्हणीनुसार गुंड तर गुंड असे मत संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत व्यक्त केले.येत्या काही दिवसात हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली नाही तर राजकीय नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांनी दिला आहे.शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशावाडीकर यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांची नुकसानी 72 तासांच्या आत पिकविमा कंपनीला कळवायचे तर मग नुकसान भरपाई पोटीची रक्कम 72 तासातच मिळाली पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.

या बैलगाड्या मोर्चात २५ बैलगाड्या घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या घोषणा बाजीने परिसर दणाणुन गेला होता.नायब तहसिलदार मारोतराव जगताप यांना शेतक-याच्या विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी दशरथ कदम,बाला कदम, विठ्ठल भिसे, संतोष कदम, चंद्रकांत कल्याणकर, व्यंकटराव कदम, पंडीत कदम,अवधुत कदम, प्रल्हाद बंडाळे, संभाजी कदम,अभिमन्यू कदम, ज्ञानोबा कदम, विश्वांभर कदम यांच्यासह हजारो शेतकरी मोर्चात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.