शेतीची मशागत करून परतनाना ट्रॅक्टर उलटला; दोघे जण दबून ठार

193

अर्धापूर : तालुक्यातील भोकरफाटा ते बारड -भोकर रस्त्यावर (खैरगाव पाटीजवळ) असलेल्या कॅनॉलजवळ ट्रॅक्टर उलटल्याने दोघे ठार झाले. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.

तुषार सूर्यभान कळणे (वय १५), पुरभाजी मारोतराव गिरे (वय २०़ दोघे रा. सरेगाव) अशी मयतांची नावे आहेत. दोघेही ट्रॅक्टरखाली दबून जागीच ठार झाले. बारड महामार्गाचे सपोनि येवते, जमादार शेख, स्वाधीन ढवळे, संतोष वागतकर, निलेवार, अमोल सातारे यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढावे लागले. खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे सुरू असून, ट्रॅक्टरचालक शेतकामे करून कच्च्या रस्त्यावरून जात असताना ट्रॅक्टर अचानक उलटून अपघात झाला.
घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. टी. नांदगावकर, साईनाथ सुरवसे, कपिल आगलावे, बालाजी तोरणे, कोकरे, भाकरे, संतोष सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी भेट दिली. मयतांना महामार्ग रुग्णवाहिकेने अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.