शेनीच्या चेअरमन पदी माधवराव विठ्ठलराव शिंदे,व्हाईस चेअरमन पदी आनंदराव धुमाळ यांची बिनविरोध निवड

1,168

                        सखाराम क्षीरसागर

                          अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर तालुक्यातील शेनी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी माधवराव विठ्ठलराव शिंदे यांची तर व्हाईस चेअरमन पदी आनंदराव मुकुंदराव धुमाळ यांची दि.१६ रविवारी रोजी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी अरूणा केंद्रे,सचिव सखाराम पवार यांनी करताच गावकरी मंडळीने जल्लोष केला आहे.

चेअरमन माधवराव शिंदे, व्हाईस चेअरमन आनंदराव धुमाळ, प्रकाशराव शिंदे, जेठराव धुमाळ, व्यंकटराव शिंदे, गंगाधर धुमाळ, शंकरराव मस्के, गणेश पन्नासे, शामराव गवळी, सौ.कौशल्याबाई उत्तमराव धुमाळ, सौ.प्रयागबाई धुमाळ, शंकरराव शिंदे, गणेश गोरे यांनी बिनविरोध निवड करण्यासाठी प्रयत्न केले. तर चेअरमन माधवराव शिंदे, व्हाईस चेअरमन आनंदराव धुमाळ यांच्या निवडीचे जल्लोषात सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच व उपसरपंच व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.