श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून सर्वांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन गुरूराज रणखांब यांनी जयंती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. युवा महासभेच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सखाराम क्षीरसागर तर प्रमुख उपस्थिती प्रमुख वक्ते गुरूराज रणखांब, ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष छत्रपती कानोडे,पत्रकार गुणवंत विरकर, शिवासंघटना तालुकाध्यक्ष विलास कापसे,माजी सरपंच शंकर ढगे, संयोजन शंकर गोमाशे, शिवहार गोविंदपूरे,ओम नागलमे, शिवशंकर वाघमारे, शहराध्यक्ष संजय वाघमारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करून हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सामाजिक कार्यकर्ते गुरूराज रणखांब म्हणाले की, श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांचा आदर्श घेऊन भावी पिढीने कार्य करावे,समाजातील तरूणांनी भविष्यातील आव्हाने लक्षात घेता शिक्षणाकडे लक्ष घालावे व श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे असे आवाहन रणखांब यांनी केले. या प्रसंगी अनेकांनी आपले विचार मांडले.
यावेळी योगेश वाघमारे,गजानन वाघमारे, सुनिल शिंदे, शिवहार घोडेकर,देवानंद घोडेकर, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवानंद घोडेकर यांनी केले तर आभार सटवाअप्पा सोनवणे यांनी मानले.