संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या निवड समिती सदस्यांमध्ये नांदेडचे पोलीस अंमलदार के.आर.अन्सारीचा समावेश.

राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेच्या निवड समितीमध्ये सदस्य पदावर नांदेडच्या व्यक्तीला पहिल्यांदाच बहुमान.

595
नांदेड –

नांदेड येथील जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार के.आर.अन्सारी उर्फ साजीद यांची द वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) ने संतोष ट्रॉफीसाठी महाराष्ट्राची टिम निवडणाऱ्या सदस्यांमध्ये साजीद यांचा समावेश केला आहे. नांदेडमधून पहिल्यांदाच कोणाची विफाच्या निवड समितीत निवड झाली आहे.

नांदेडच्या जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस अंमलदार के.आर.अन्सारी उर्फ साजीद हे पुर्वीपासूनच फुटबॉल या खेळाचे खेळाडू आहेत. त्यानंतर त्यांची निवड पोलीस दलात झाली. पोलीस दलात जवळपास 27 वर्षांची त्यांची सेवा झाली आहे. विफाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे आहेत. विफाचे सेक्रेटरी सौतर वज यांनी के.आर.अन्सारी यांना पाठवलेल्या पत्रानुसार विफा या संघटनेने संतोष ट्राफी 2021-22 मध्ये खेळणाऱ्या महाराष्ट्र टीमची निवड करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यंदाची संतोष ट्राफी प्रतिस्पर्धा राजस्थान राज्यातील जयपूर येथे 1 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. संतोष ट्राफीमध्ये खेळणारे खेळाडू 21 वर्षाखालील असतात. महाराष्ट्रातील टीमची निवड करण्यासाठी कोपरेज फुटबॉल मैदान मुंबई येथे निवड प्रक्रिया दि.8 नोव्हेंबर रोजी पुर्ण केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस अंमलदार के.आर.अन्सारी उर्फ साजीद यांना तेथे बोलावण्यात आले आहे.

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा ही देशपातळीवरील नामांकित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने पाठवल्या जाणाऱ्या टिमची निवड करण्यात नांदेडमधून पहिल्यांदाच कोणाची निवड झाली आहे आणि तो बहुमान के. आर. अन्सारी उर्फ साजीद या पोलीस अंमलदारांना मिळाला आहे.

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा प्रक्रियेत निवड समितीचे सदस्य पद मिळवणाऱ्या के.आर.अन्सारी उर्फ साजीदचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, विक्रांत गायकवाड, सचिन सांगळे, डॉ.सिध्देश्र्वर भोरे,पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर,जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, प्रशांत देशपांडे, आनंदा नरुटे, भगवान धबडगे, अभिमन्यु साळुंके, अनिरुध्द काकडे, संजय हिबारे, शिवाजी डोईफोडे, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांनी कौतुक केले आहे तर मित्र परिवारांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.