‘संभाजी ब्रिगेड’च्या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद.

375

नांदेड –
ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिणच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी नांदेड ते लातूर मुख्य रस्त्यावरील मुसलमानवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या रास्तारोको आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

संभाजी ब्रिगेड नांदेड (दक्षिण)चे तालुका अध्यक्ष दत्ता येवले पाटील व त्यांचे सहकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी नांदेड तहसील कार्यालयात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, सोयाबीन आणि शेतकऱ्यांच्या अन्य पिकांना हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी १ ऑक्टोबर रोजी नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मुसलमानवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. या निवेदनात संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिणचे तालुकाध्यक्ष दत्ता येवले पाटील यांनी ५ व ६ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचेही नमूद केले आहे. तदनंतर २६, २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने नांदेड तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान, मुसलमान वाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे तसेच शाम पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिणचे तालुका अध्यक्ष दत्ता येवले व त्यांचे अन्य सहकारी कार्यकर्ते सुनील हिवंत, चंद्रकांत कदम, ज्ञानेश्वर शिंदे, कामाजी कदम, नितीन कोकाटे, अंकुश कोल्हे, कृष्णा मोरे, माधव पवार, पांडुरंग क्षीरसागर, राजू शिंदे, तुकाराम येवले, हनुमान लामदाडे, कैलास पुंड, बालाजी शिंदे, बालाजी काकडे, सतीश क्षीरसागर, माणिक डक, ज्ञानेश्वर लामदाडे, शाम वानखेडे, शंकर डक, संतोष कदम, ऋषिकेश येवले, बालाजी लामदाडे, गजानन डक, चंद्रकांत क्षीरसागर, माधव पावडे, नंदकुमार डक, संदीप क्षीसागर, सतीश जाधव आदींचा समावेश होता. या आंदोलना दरम्यान, कुठलीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले, पोउपनि. बाबूराव केंद्रे, विशेष शाखेचे पोलीस नाईक संजय जाधव, विश्वनाथ वसमते, सुरेश कांबळे, मोहन झुंजारे, तुकाराम नागरगोजे तसेच त्यांच्या अन्य सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.