सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात वाईट दिवस -सिमाताई नरोड.

599

नायगाव, नांदेड –

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी जगाचा राजा,अन्नदाता हे केवळ बोलण्यापुरतेच आहे.प्रत्येक पक्षाच्या शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत.सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात वाईट दिवस आले आहेत अशी टीका शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्या प्रमुख सिमाताई नरोड यांनी केली.

मांजरम ता.नायगाव येथील हनूमान मंदीराच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी सात वाजता शेतकरी संघटनेच्या वतीने गाव सभा घेण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.शेतकरी कुटुंबातील बाप, आई, मुलगा, मुलगी,आजी, आजोबा ही सगळी मंडळी शेतीत राबून देखील त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येत नाहीत.याला शासनाचे शेतीविषयी चूकीचे धोरण आहे.हे धोरण बदलण्याची गरज असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्रित येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे असे विचार सिमाताई नरोड यांनी मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित पाटील बहाळे होते.या कार्यक्रमाला संघटनेचे अनिल घनवट, गुणवंत पाटील हंगरगेकर, सुधीर बिंदू,रामजीवन बोंदर, अँड.धोंडीबा पवार-आलूवडगावकर, शिवाजीराव शिंदे, व्यंकटराव पाटील वडजे, माधवराव पा.सिंधीकर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच शोभाबाई निळकंठराव मांजरमकर,व्यंकराव शिंदे,सुधाकर गोविंदराव शिंदे, विलास शिवराज शिंदे, विलास गंगाधर शिंदे, सूर्यकांत पा शिंदे, साहिर संभाजी पा शिंदे, मारोती कोंडामंगल, संजय बाईंनवाड, हणमंत गायकवाड,बालाजी शिंदे, पंडित माधवराव शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.