सरपंच परिषदेच्या नायगाव तालुकाध्यक्षपदी सचिन पा. बेंद्रीकर तर जिल्हा उपाध्यक्षपदी माधव कोलगाने.
नायगाव, नांदेड –
नायगाव तालुक्यातील नायगांव बेंद्री येथील रहिवाशी असलेले सरपंच सचिन बेंद्रीकर यांची नायगाव तालुका सरपंच अध्यक्षपदी तर मौजे बरबड्याचे सरपंच माधवराव कोलगाने यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दि.६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे ताज पाटील हॉटेलमध्ये महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी निलेश देशमुख, वैजनाथ पाटील,मारोतराव कदम कुंटूर,यादव पाटील, शिवराज वरवटे, युवराज लोखंडे, रमेश हंबर्डे, मोहन जोगेवार, गोविंद ताटे,गोविंद,डाकोरे, सुरेश पाटील, साहेबराव पवार, प्रभाकर मोरे, संभाजी पवार, किरण कदम, गणेश पवार, रामकिसन भैरवाड, राहुल नकाते, शिवा गडगेकर, गजानन भिलवंडे, सुधाकर डोईवाड, प्रदीप गारोळे, गोविंद सर्मपवार, गजान पाटील जुन्ने, मोहन मावले, गिरी महाराज गंगाधर बेलकर, परसराम राठोड, डॉ.दत्ता मोरे, बालाजी लोव्हाळे, मनोहर तोटरे, राजेश बावने, साहेबराव कांबळे, गंगाधर धूप्पा,सतीश वाघमारे, उत्तम रोडेवार, संभाजी शिंदे, मारोती कदम, साईनाथ पिल्लेवाड, दीपक पाटील, तुळशीराम नागलवाड, माधव डोईफोडे उपस्थित होते.