सर्वसामान्यांचा जवळचा घटक म्हणजेच पोलीस ठाणे अंमलदार- पो.नि.घोरबांड.

276

नांदेड –

पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा सर्वात जवळचा घटक म्हणजे ‘पीएसओ’ अर्थात पोलीस ठाणे अंमलदार असतो, असे प्रतिपादन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तथा पोलीस ठाणे अंमलदार डी. एन.मोरे – खैरकेकर हे पोलीस दलातील तब्बल ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी रात्री सपोउपनि. डी.एन. मोरे यांना निरोप देण्यात आला आहे. या निरोप समारंभाच्या अध्यक्षीय समारोपात प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड – कलंबरकर बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक पो.नि.अनुक्रमे सुरेश थोरात, विश्वजीत कासले, संकेत दिघे, पोउपनि. माणिकराव हंबर्डे, आनंद बिचेवार, नुतन पोउपनि. अशोक देशमुख, सपोउपनि. तथा पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते, सहा. पोउपनि. शेषेराव शिंदे सहाय्यक पोउपनि. गंगाधर भालेराव यांच्यासह हेडकॉन्स्टेबल संजय रामदिनेवार, संभाजी व्यवहारे, साहेबराव मुपडे, आशाताई केंद्रे, महिला हेडकॉन्सटेबल आठवले आदींचीही उपस्थिती होती.

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड म्हणाले, पेन व पुस्तकाच्या जो जवळ असतो, तो सर्वांच्या जवळचा असतो. जळतो तोच उजळतो.सोन्याला उजळून बघितल्या जाते, लोखंडाला नाही, असे सांगून पोलीस ठाण्यात कोणत्याही कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांचा जवळचा घटक म्हणजेच ‘पीएसओ’ अर्थात पोलीस ठाणे अंमलदार असतो, असे आवर्जून सांगितले. निरोप समारंभास पोलीस नाईक ज्ञानोबा कवठेकर, दिलीप चक्रधर, लालजी आडे व पो. कॉ. अनुक्रमे शिवकांत कानगुले, विश्वनाथ पवार, रेणुप्रसाद भोपाळकर व तानाजी ठाकूर यांच्यासह महिला पो.कॉ.अश्विनी मस्के, ज्योती आंबटवार, वैशाली घोनशेटवाड आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही बहुसंख्येने उपस्थिती होती.

प्रारंभी, नांदेड ग्रामीण ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोउपनि. डी. एन.मोरे खैरकेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मोरे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान, सपोनि. विश्वजीत कासले व सपोनि. सुरेश थोरात यांचेसह सपोनि.संकेत दिघे व नूतन पोउपनि.अशोक देशमुख आदींनी मनोगताद्वारे सहाय्यक पोउपनि. डी. एन. मोरे यांच्या नांदेड पोलीस दलातील उत्कृष्ट आणि निष्कलंक सेवेबद्दल अर्थातच त्यांच्या निःपक्षपाती कार्यप्रणालीबद्दल गौरवोदगार काढले.प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन सपोनि.कासले यांनी केले, तर सपोनि. सुरेश थोरात यांनी मनोगतात सहा. पोउपनि. डी. एन. मोरे हे नांदेड पोलीस दलातील केवळ ‘कोरोना’ योध्दाच नव्हे, तर ते पोलीस दलातील ‘अजिंक्य’ योध्दा असल्याचेही आवर्जून सांगून उपस्थित मान्यवर पाहुणे, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार, मित्रमंडळी व डी. एन. मोरे यांच्या सर्व नातेवाईकांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.