साखर कारखान्यांनी फुले-२६५ ची नोंद घ्यावी अन्यथा आंदोलन – प्रल्हाद इंगोले.

479

नांदेड –

शासनाने मान्यता दिलेल्या उसाच्या सर्व वाणांची नोंद घेणे कारखान्यांना बंधनकारक आहे त्यामुळे सर्व कारखान्यांनी फुले-२६५ जातीची नोंद घ्यावी अन्यथा कारखान्यांवर कायदेशीर कार्यवाही करून आंदोलन करण्याचा इशारा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.

फुले -२६५ या वाणाचा ऊस शेतकऱ्यांना बऱ्यापैकी परवडतो इतर उसापेक्षा या जातीच्या ऊसाची सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त येते.परंतु भाऊरावसह अनेक साखर कारखाने काही ना काही कारण देऊन २६५ ऊस लावण्यास परवानगी देत नाहीत जर काही शेतकऱ्यांनी ऊस लावला तर काही कारखानदार त्या उसाची नोंदसुद्धा घेत नाहीत अशा अनेक तक्रारी शेतकरी करत आहेत . त्यामळे जे कारखाने या ऊसाची नोंद घेणार नाहीत अशा कारखान्यांचा गाळप परवाना रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे. हल्ली सर्वच कारखाने ऊसाच्या रिकव्हरीनुसार एफआरपी दर देत आहेत जर रिकव्हरी कमी आली तर एफआरपी रेट कमी बसेल त्यामुळे २६५ वाणाच्या उसाची नोंद न घेण्यास व हा ऊस गाळपास काहीही अडचण नाही म्हणून सर्व कारखान्यांनी २६५ सह व्हीएसआय ने मान्यता दिलेल्या सर्व ऊसाच्या नोंदी घ्याव्यात अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.