सुशिलाबाई नामदेवराव देशमुख कल्याणकर यांचे निधन.
उद्या अर्धापूर येथे ११ वाजता होणार अंत्यसंस्कार.
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर येथील फुलेनगरातील ज्येष्ठ सुशिलाबाई नामदेवराव देशमुख, वय ८५ यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी आज दि.१६ मंगळवारी रोजी निधन झाले असून त्यांच्यावर उद्या दि.१७ नोव्हेंबर बुधवारी रोजी ११ वा. अर्धापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुशिलाबाई नामदेवराव देशमुख कल्याणकर यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या विद्यापीठातील कर्मचारी शिवाजी नामदेवराव देशमुख कल्याणकर व गोपाल नामदेवराव देशमुख कल्याणकर यांच्या मातोश्री होत.