सोशल मीडियावर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाची खोटी माहिती व्हायरल; अनेकांनी वाहिली श्रद्धांजली.
नवी दिल्ली –
सोशल मीडियावर आज सकाळपासून एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. त्याची तुलना देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सोबत केली जात आहे, त्या फोटोत मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याचे म्हंटले गेले आहे इतकेच नव्हे तर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे दुर्दैवी निधन झाले आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो’ असे म्हणत अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने यावर खुलासा करत म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटोचे मनमोहन सिंग यांच्याशी काही संबंध नाही. बुधवारी मनमोहन सिंग यांना ताप आल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरनी त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते पूर्णपणे रिकव्हर झाले आहे असे सांगितले आहे.
दरम्यान आज सकाळपासूनच सोशल मीडियावर मनमोहनसिंह यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत असून ही बातमी पूर्णतः खोटी आहे.