स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा उस्मानाबाद येथे मेळावा. माजी खा.राजु शेट्टी उपस्थित राहून करणार मार्गदर्शन.

513

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

स्वाभिमानी शेतकरी संघटनाप्रणित स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा मराठवाड्यातील शिक्षकांचा भव्य मेळावा उस्मानाबाद येथे दि.13 नोव्हेंबर शनिवारी दुपारी 1 वा. आयोजित केला असुन या मेळाव्याला माजी खा.राजु शेट्टी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सतीश सोनटक्के, समन्वयक प्रा.बिभीषण भैरट यांनी दिली आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न, पेंशन,100% अनुदान, कॅशलेस मेडीक्लेम योजना, प्राथमिक शिक्षकांना मतदान अधिकार व विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटना आगामी काळात ठोस भुमिका घेणार असुन त्या दृष्टीने मेळाव्यात चर्चा होणार आहे. या बैठकीला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संदीप जगताप, प्रा.जालींदर पाटील, प्रा.डॉ.प्रकाश पोपळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

मेळावा उस्मानाबाद येथे रायगड फंक्शन हॉल या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरी या मेळाव्यासाठी शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन मराठवाडा सरचिटणीस प्रा.रामणअप्पा चवळे, कार्याध्यक्ष प्रा.अजय महाजन,ज्योतीताई सोनवणे महीला आघाडी अध्यक्ष, प्रा.शिवाजी हुसे,प्रवक्ते प्रा.श्रीहरी खुर्दामोजे, नांदेड जिल्हाध्यक्ष शेख जावीद,संदीप पटकोटवा, मोईन शेख, प्रा.कैलास खानसोळे, हिंगोली जिल्हा दळवी सर, वाबळे सर, हकीम सर जिंतूर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.