स्व.आर.आर.पाटील यांच्या नावाने सभागृह निर्माण करा – न.प.च्या बांधकाम सभापती सौ. वनिता जोगदंड यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

222

माहूर, नांदेड –

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून राज्यात ज्यांचे नाव अजरामर आहे असे राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत नेते आर.आर.पाटील आबा यांच्या नावाने माहूर शहरातील वार्ड क्र.१ मधील फांदाडे ले आउट मधील खुल्या जागेमध्ये वैविध्यपूर्ण योजनेच्या निधीतून खुले सभागृह निर्माण करून खुल्या मोकळ्या जागेचा विकास करा अशी मागणी न.प.च्या बांधकाम सभापती सौ. वनिता भगवानराव जोगदंड यांनी मुख्याधिकारी न.प. माहूर यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

गत वर्षी माहूर न.प.च्या वतीने शहरातील अनेक ले आउटमधील सार्वजनिक कामासाठी आरक्षित ठेवलेल्या ओपन स्पेस ताब्यात घेतले होते. त्यानंतर नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत सदर ओपन स्पेस मध्ये स्व.आर. आर. पाटील यांच्या नावाने सभागृह निर्माण करण्याचा ठराव सुद्धा घेण्यात आला. परंतु गेल्या पाच वर्षापासून माहूर नगरपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता असतांना देखील सदर ठरावास मूर्त स्वरूप येऊ शकले नसल्याची खंत वाटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधी बांधकाम स्भापत्ती सौ. जोगदंड यांनी केलेल्या मागणीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सदर वार्ड १ मधील ओपन स्पेसवर स्व.आर. आर. पाटील खुले सभागृह भव्य विचार पीठ,शेड, वाल कंपाऊंड, कमान गार्डनसह अंदाज पत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता घेऊन वैविध्यपूर्ण योजना विकास निधीतून विकसित करून शहराची शोभा वाढवावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनाची प्रत नगराध्यक्षा शीतल जाधव यांना दिली असून माहूर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष असल्याने या मागणीची पूर्तता कधी होणार याकडे स्व.आर.आर.पाटील यांच्या विचारांना आदर्श मानणाऱ्या माहूर शहरातील व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.