हदगावच्या दत्त बर्डी येथे दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

451
पुरुषोत्तम बजाज,
हदगाव, नांदेड –
हदगाव येथील श्री दत्तात्रय संस्थान येथे दि.१८ रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्यासह इतर काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे संयोजक श्री श्री.१००८ श्री महंत गोपाळगिरी गुरू रायगिरी महाराज हे असून या ठिकाणी  दिनांक १२ रोजीपासून अखंड दत्त नाम सप्ताहास सुरुवात झाली आहे.
दत्तबर्डी हे संस्थान दत्त गुरूच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी याची ख्याती आहे. येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दत्त जन्मोत्सव दिनांक १८ डिसेंबर २०१९ रोजी तसेच दिनांक २० डिसेंबर रोजी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. याच बरोबर दररोज रात्री ९ ते ११ मध्ये पालकी सोहळा पार पडणार असून  दिनांक १८ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दत्तबर्डी संस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेली गुरु परंपरा आहे. या संस्थांवर आत्तापर्यंत २५ महंत होऊन गेले आहेत व सव्वीसावी गादी चालू आहे. हे संस्थान माहूरच्या बरोबरीचे संस्थान असून या संस्थानास हजारो एकर जमीन या संस्थानास दान दिली असल्याची माहिती महंत गोपाल गिरी गुरू रायगिर महाराज यांनी दिली आहे तसेच या संस्थानाचा पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

श्री दत्त जन्म निमित्ताने या वर्षी संपूर्ण तयारी झाली असून येथे भव्य यात्रा ही भरली जाते त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात व विविध कार्यक्रमाचा लाभ घेत असतात या वर्षी दिनांक १९ रोजी रात्री १ ते २ या वेळात पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक २० रोजी दुपारी १ ते २ या कालावधी मध्ये दहीकाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असून आयोजित कार्यक्रमाचा सर्वभाविक भक्तांनी लाभ घ्यावा व सर्वांनी कोरोना नियमाचे पालन करावे,असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.