हदगाव उपविभागात पत्रकारांच्या अनुपस्थित वनहक्क कार्यशाळा संपन्न.

लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाचा पडला विसर; केवळ प्रेस नोट देऊन संबंधित कार्यालय झाले मोकळे.

479
पुरुषोत्तम बजाज,
हदगाव, नांदेड –

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय, हदगाव यांच्या वतीने हदगाव येथे पंचायत समितीच्या सभागृहात एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस हदगाव उपविभागातील उपविभागीय स्तरीय समितीचे विद्यमान सदस्य, तहसिलदार, गटविकास अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी, ग्रामस्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष सरपंच, ग्रामसेवक , मंडळ अधिकारी, तलाठी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वनहक्क कार्यशाळेस दुपारी 12 वाजता सुरुवात झाली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक उपविभागीय स्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी, हदगाव यांनी केले व वनहक्क कायद्याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस मास्टर ट्रेनर म्हणून  के. एम. पटणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सर्व उपस्थितांना वनहक्क कायद्याबाबत माहिती देऊन प्रस्ताव कसा सादर करावा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणते, मंजूर कसा करावा त्याच्या अटी व शर्ती कोणत्या याबाबत संपूर्ण माहिती दिली. कार्यशाळेत निर्माण झालेल्या शंकाचे समाधान /निरसन मा.उपविभागीय अधिकारी यांनी व मास्टर ट्रेनर पटणे यांनी केले.

सदर कार्यशाळेस जीवराज डापकर, तहसीलदार हदगाव, केशव गड्डापोड, गटविकास अधिकारी हदगाव, हंबर्डे बी. बी. नायब तहसीलदार, दामोधर जाधव नायब तहसीलदार, उपविभाग स्तरीय समितीचे सदस्य संदीप राठोड, खोब्राजी वाळके तसेच विजय कटके, वनपरिक्षेत्र अधिकारी हदगाव, श्रीमती संध्या डोके मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर, विविध गावचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रीमती रुपाली हंबर्डे तलाठी यांनी केले.तसेच बी. बी. हंबर्डे नायब तहसीलदार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यशाळे निमित्त ब्रिजेश पाटील मा.उपविभागीय अधिकारी,हदगाव यांनी पात्र लाभार्थी यांनी वनहक्क प्रस्ताव ग्रामस्तरीय समिती मार्फ़त उपविभाग स्तरीय समितीस सादर करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यशाळेचे नियोजन जीवराज डापकर, तहसिलदार हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल शेवाळकर, श्रीमती पुष्पा येऊल महसूल सहायक, दफेदार शेख अल्लाबक्ष, रशीद शेख, सदाशिव पाईकराव, देविदास मॅकलवार शिपाई , संतोष खंदारे कोतवाल यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.