हदगाव शहरातील व्यापारी आस्थापना यांनी कोव्हिडं-19 ची लस घेतल्याचे प्रमाणपत्र दुकानात ठेवणे बंधनकारक.

मुख्याधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन.

584
पुरुषोत्तम बजाज
हदगाव, नांदेड –

सध्या सपूर्ण देशात कोव्हिडं-19 च्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून सदरील तिस-या लाटेपासून बचाव करण्याकरीता लसीकरण करून घेणे अत्यंत महत्वाचे असून कोव्हिडं-19 च्या सर्व नियमाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. सध्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सर्व व्यापारी प्रतिष्ठानामध्ये नागरिक, ग्रामीण भागातील जनता लहान बालके खरेदी करण्याकरीता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत त्यामुळे कोव्हिडं -19 चा प्रार्दुभाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासना मार्फत कोव्हिडं -19 पासून बचाव करण्याकरीता मिशन कवचकुंडल अंतर्गत मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली असून लसीकरण आलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून त्या अनुषंगाने हदगाव शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान मधील मालक व त्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व नौकराचे कोव्हिड -19 चे लसीकरण झाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र दुकानात ठेवणे बंधनकारक असल्याचे मुख्याधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले. ज्या व्यापारी प्रतिष्ठाना मध्ये दुकान मालक व त्यामध्ये काम करणा-या प्रत्येकाचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दुकानामध्ये लावणे बंधनकारक असून लसीकरण न झाल्याचे तपासणी अंती निर्देशनास आल्यास सदरील व्यापारी प्रतिष्ठाना विरुध्द कोव्हिड-19 च्या नियमाचे उल्लंघन केल्या बाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.