अर्धापुरात टायरचे दुकान फोडून 3 लाख 84 हजार रुपयांचे टायर चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर शहरातील देशमुख पाटील पेट्रोल पंपाच्या बाजूला विनायक टायर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी 3 लाख 84 हजार 282 रुपयांचे टायर चोरट्यांनी दि.9 गुरुवारी रात्री चोरून नेल्याची घटना घडली असून या चोरी प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संतोष सुर्यवंशी यांनी दिली आहे.
अर्धापूर-नांदेड रोडवरील स्वराज बारच्या समोर देशमुख कॉम्प्लेक्स मध्ये विनायक टायरचे दुकान असून बाजूच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील अपोलो, एमआरएफ आयचर,बोलोरो,पिकपसह अनेक टायर चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी विनायक टायरचे मालक गजानन रूख्माजी पिंपळगावकर यांच्या फिर्यादीवरून 3 लाख 84 हजार 282 रूपयांचे टायर चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अर्धापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टायर चोरी झालेल्या दुकानास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी भेट देऊन आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउपनि कपील आगलावे, पोउपनि म.तय्यब यांना दिल्या आहेत. डीएसबीचे जमादार भिमराव राठोड, राजेश घुन्नर, कल्याण पांडे, महेंद्र डांगे हे चोरट्यांचा मार्ग काढत आहेत. या चोरीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे हे करीत आहेत.