युक्रेनमद्धे फसलेले नांदेडचे 3 विद्यार्थी सुखरूप परतले; विमानतळावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून स्वागत..!

कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू

937
नांदेड –

रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे युक्रेनमध्ये फसलेले नांदेडचे 3 विद्यार्थी आज सुखरूप नांदेड शहरात परतले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कुटुंबियांसह पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू…

नांदेडचे सुमारे ३० विद्यार्थी युक्रेनमध्ये फसले असून, आज परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशांत नरोटे, तेजस गायकवाड, संजीवनी वन्नाळीकर यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी सुखरूप घरी परतल्यानंतर त्यांच्या व कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचा…

याप्रसंगी उपस्थित असलेले पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्वीटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. युक्रेनमध्ये फसलेले नांदेडचे काही विद्यार्थी आज सुखरूप परतले. त्यांच्या हालापेष्टा ऐकून मन व्यथित झालं. पण घरी परतल्याचा त्यांच्या व पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचा होता, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.