परभणीजवळ पोलीस नाव असलेल्या भरधाव जीपने 4 दुचाकींना उडवले; एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी

3,060

परभणी –

शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या कालव्यावरील पुलाजवळ चालकाने आपले वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून चार दुचाकींना उडवले. यात एकाचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी (दि.4) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यातील जखमींना उपचारासाठी परभणीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहन तेथेच सोडून जीपमधील सर्वजण पळून गेले. ती जीप जालना जिल्ह्यातील असून हे वाहन पोलिसांचे आहे, अशी चर्चा अपघातस्थळी होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीप क्र.एम.एच. 21 बी.एफ.4477 ने परभणी-जिंतूर रोडवर 6 दुचाकी वाहनांना चिरडले. या अपघातात 60 वर्षीय व्यक्ती मरण पावला आहे. तर गणेश ढाकरगे (वय 5 वर्ष), लक्ष्मण ढाकरगे (वय 35 वर्ष), बालासाहेब देशमुख (वय 28 वर्ष), सुभाष कदम (वय 60 वर्ष सर्व रा.धर्मापुरी), ता.जि. परभणी सचिन देशमुख, दत्तराव प्रकाश देशमुख (दोघे रा.झरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. इतरही काही इसम जखमी असून त्यांची नावे मात्र समजू शकली नाही. जखमींना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, एम.एच. २१ बी.एफ. 4477 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने परभणी जितूर रोडवर एम.एच.22- ए.व्ही.3292, एम.एच.22- जे. 7919, एम.एच.22 ए.आर.6596, एम.एच.22 ए.एफ. 3966 या वाहनांना चिरडले. अपघातात फयाज अली खान यांचा मृत्यू झाला तर इतर जखमी झाले आहेत. अपघात करणाऱ्या चारचाकी वाहनात सहा जण होते. हे सर्वजण अपघातानंतर पळून गेले. अपघात करणारे वाहन जालना जिल्ह्यातील असून या वाहनावर पोलीस नावाची प्लेट होती अशी चर्चा अपघातस्थळी होती. ऐन रस्त्याच्या मधोमध अपघात झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगा लागल्या. नानलपेठ, शहर वाहतूक शाखा यांच्या पथकाने अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक रागसुधा आर., उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलीस लिहलेल्या ‘त्या’ वाहनात मद्यपी इसम

परभणी- जिंतूर रोडवर दुचाकीस्वारांना चिरडणाऱ्या एम. एच. 21- बी.एफ. 4477 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनामध्ये असलेले इसम दारू पिलेले होते.या वाहनावर पोलीस नावाची प्लेट होती अशी चर्चा अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शीमध्ये सुरु होती. जिंतूर रोडकडून भरधाव वेगात आलेल्या या वाहनाने दुचाकीस्वारांना उडविले. यात एकाचा जीव गेला तर इतर जखमी झाले आहेत. वाहनातील इसम हे पोलीस कर्मचारी होते का इतर कोणी? याचा शोध घेतला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.