देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक; सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

843
नांदेड –
नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि वंचितच्या उमेदवारांसह एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात झाली असून एकूण मतमोजणीच्या 30 फेऱ्या होणार आहेत.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. यामुळे येथील जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर तर भाजपाकडून सुभाष साबणे व वंचितकडून उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. महाविकास आघाडीचे मंत्र्यासह अनेक नेते गण प्रचारात उतरले होते. तर शिवसेनेतून भाजपावासी झालेले सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते ठाण मांडून होते. वंचितच्या उमेदवार उत्तम इंगोले यांच्यासाठीही बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या स्वतः लक्ष घातले होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून या निवडणुक निकालाकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.

या पोटनिवडणुकीत 63.95 टक्के मतदारांनी बजावले होते मतदानाचे कर्तव्य. पोटनिवडणूकीसाठी 412 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. एकुण पुरुष मतदार 1 लाख 54 हजार 92 तर एकुण स्त्री मतदार 1 लाख 44 हजार 256 एवढे आहेत. इतर मतदार 5 असे धरुन ही एकूण मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 353 एवढी आहे. यापैकी एकूण 1 लाख 90 हजार 800 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. यात पुरुष 1 लाख 768 मतदार तर स्त्री 90हजार 31 मतदार तर इतर 1 मतदार असा समावेश आहे. मतदानाची एकुण टक्केवारी ही 63.95 टक्के एवढी आहे.

आज सुरू असलेल्या मतमोजणीसाठी सुमारे 150 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी 14 टेबल तयार करण्यात आले असून सुमारे 30 मतमोजणीच्या फेऱ्या होतील. पहिली फेरी सकाळी 8 पासून सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने उर्वरीत फेऱ्या पूर्ण होतील.

फेरी क्रम.–1

1.जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
4216

2.सुभाष साबणे (भाजप)
2592

3.डॉ.उत्तम इंगोले (वंचित)
320

फेरी क्रम.–02

1.जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
3078

2.सुभाष साबणे (भाजप)
2409

3.डॉ.उत्तम इंगोले (वंचित)
449

फेरी क्रम.–3

1.जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
10712

2.सुभाष साबणे (भाजप)
7448

3.डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
873

फेरी क्र.4

1.जितेश अंतापूरकर(काँग्रेस)
14500

2.सुभाष साबणे (भाजप )
9943

3.डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
1225

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर
4557 मतांनी आघाडीवर.

फेरी क्र.5
1.जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
3747

2.सुभाष साबणे (भाजप )
2134

3.डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
280

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर
1613 मतांनी आघाडीवर.

काँग्रेसचे अंतापूरकर एकूण 6170 मतांनी आघाडीवर.

फेरी क्र.6
1.जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
22332

2.सुभाष साबणे (भाजप )
14564

3.डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
1838

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर
1613 मतांनी आघाडीवर.

काँग्रेसचे अंतापूरकर एकूण 7768 मतांनी आघाडीवर.

Leave A Reply

Your email address will not be published.