पेट्रोल पंपांचे साडेनऊ लाख लुटण्याचा प्रयत्न करणारे ५ आरोपी जाळ्यात

1,462

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर तालुक्यातील पेट्रोल पंपांचे पैसे बँकेत मॅनेजर भरण्यासाठी जात असताना साडेनऊ लाख रुपये लुटीचा प्रयत्न फसला होता.या चोरी प्रकरणातील ५ आरोपींना गजाआड केले असून अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा १५ दिवसात लावल्यामुळे पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी अर्धापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि.१४ मार्च रोजी पेट्रोल पंपावर जमा झालेले ९ लाख ५४ हजार रुपये बँकेमध्ये भरण्यासाठी व्यवस्थापक दादाराव डाके जात असताना समोरून आलेल्या दुचाकीवरील एम एच ३८-०८९३ बजाज पल्सर वरील तोंडावर कपडे बांधलेल्या अज्ञातांनी डाके यांची गाडी पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांचा लुटीचा डाव फसला होता सदर प्रकरणी दादाराव डाके यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम ३९३ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी पोलीसांचे दोन पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून गुप्त खबरांच्या मार्फत माहीती घेऊन ५ चोरट्यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे, राजेश घुन्नर, संजय घोरपडे, महेंद्र डांगे यांनी वसमत तालुक्यातील १) राजू एकनाथ चव्हाण खांडेगाव ता. वसमत, २)सर्जेराव रोहिदास होळपादे करंजी ता. वसमत, ३)देवानंद बालाजी दुधमोगरे खांडेगाव ता. वसमत, ४)अतुल रमेश तुरेवार रा खांडेगाव ता.वसमत, ५)पवन माणिकराव डाखोरे पळसगाव ता.वसमत यांना पकडले असता पोलीस कोठडीत १) निळा येथील वैशालीताई पावडे पेट्रोल पंपांवर जबरी चोरी व २) आसेगाव पोलीस ठाणे जि.वाशिम अंतर्गत आनंदी पेट्रोल पंपावर चोरी केेल्याची कबुली दिली आहे.
३)रुद्री पाटी जवळील कैलास या पेट्रोल पंपावर चोरी  तसेच ४) महागाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर चोरी केल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे. पोलिसांनी पैसे लुटून चोरी करणाऱ्यांचा छडा पंधरा दिवसात लावला आहे.

या चोरी प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून तालुक्यातील मागील काळात झालेल्या चोरांची माहीती मिळण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.