नांदेड गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाचा 64 वा सामुहिक विवाह महोत्सव संपन्न
नांदेड –
नांदेड गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या वतीने आयोजित 64 वा सामुहिक विवाह महोत्सव शानदाररित्या उत्साहात संपन्न झाला. दि.3 आणि 4 डिसेंबर रोजी झालेल्या या सामुहिक विवाह मेळाव्यात तख्त सचखंड श्री हजूर साहिबचे आदरणीय जत्थेदार सिंघ साहिब भाई कुलवंत सिंघजी व सर्व माननीय पंजप्यारे साहिबान तसेच गुरुद्वारा श्री लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या आयोजनामध्ये गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.पी.एस.पसरीचा यांनी आपले मनोगत पत्राद्वारे व्यक्त केले.
सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी म्हणून गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे दरवर्षी दोन सामुहिक विवाह मेळावे (मे व डिसेंबर महिन्यात) आयोजित करण्यात येतात.आता पर्यंत एकुण 63 विवाह मेळावे संपन्न झाले आहेत. यामध्ये जवळ-जवळ 2500 जोडप्यांचे विवाह गुरुद्वारा बोर्डातर्फे करण्यात आलेले आहेत. या वर्षीही दि. 3 व 4 डिसेंबर रोजी 64 वा सामुहिक विवाह मेळावा श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे माननीय पंजप्यारे साहिबान व इतर प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये देशाच्या विविध भागातून सामुहिक विवाह मेळाव्यात विवाहबध्द होण्यासाठी,13 जोडपी सामील झाली. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सम्मान करण्यात आला.
यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स.शरणसिंघ सोढी, उप अधीक्षक स.ठाण सिंघ बुंगई, स. राजदेविंदर सिंघ अजीत सिंघ कल्ला तसेच स.हरजीत सिंघ कडेवाले, स.जसवीर सिंघ सोहल मेळावा संयोजक, स. विक्रमजीत सिंघ कलमवाले, स.जसवीर सिंघ शाहू, लंगर एचओडी. स.ठाकुर सिंघ बुंगई, स. हरपाल सिंघ शिलेदार- सी एस ओ स.परविन्दर सिंघ वासरीकर, कॅशीअर स.चलविंदर सिंघ फौजी – लेखापाल, स. दिलबाग सिंघ – बिल्डींग सुपरवाईजर. स.जगदीप सिंघ लांगरी – चेअरमन कर्मचारी पतसंस्था तसेच गुरुद्वारा बोर्डाचे सर्व कर्मचारी, हजुर साहिब आय टी आय स्टाफ, खालसा हायस्कुल स्टाफ सचखंड पब्लीक स्कुल (सी बी एस ई) संपूर्ण स्टाफ आणि गुरुद्वारा श्री लंगर साहिबचे 100 सेवादारांनी सेवा देत, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.